स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:35+5:302021-02-27T04:45:35+5:30

बीड : शहरातील सहयोग नगर भागातील स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र ...

Kingdom of dirt in the stadium area | स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य

स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य

googlenewsNext

बीड : शहरातील सहयोग नगर भागातील स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र घाण दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. स्वच्छतेची मागणी आहे.

महामंडळाला निधी उपलब्ध करून द्या

बीड : मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आलेले सर्व प्रकारचे जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज वाटपासाठी आर्थिक निधीची तरतूद करून, या आर्थिक विकास महामंडळाला महाबंडल होण्यापासून वाचवा अशी मागणी एआयएमआयएमचे शेख मतीन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून केली आहे.

स्वच्छतागृहाची दुर्दशा, महिला प्रवासी त्रस्त

पाटोदा : येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालयात असुविधा असल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. आगार प्रमुखांनी लक्ष देत स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी आहे.

नाल्या तुंबल्याने नागरिकांना त्रास

बीड : शहरातील शाहूनगर परिसरात नाल्या तुंबलेल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर खड्डे पडलेले असून, याच खड्ड्यात हे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती देखील वाढत आहे.

अध्यक्षपदी सचिन रणखांबेंची निवड

बीड : भारतीय बौद्ध महासभेच्या मराठवाडा अध्यक्षपदी सचिन रणखांबे यांची तर संपर्क प्रमुखपदी योगेश जावळे यांची निवड संघटनेच्या बैठकीत जाहीर केली गेली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिनेश हनुमंते होते तर संघटनेचे राज्य मुख्य सचिव बी. आर. बनसोडे, राज्य प्रवक्ते वैभव धबडगे यांच्यासह मराठवाड्यातून पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांतून वाहतूक

बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवणफाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्डेमय रस्त्यांवरून वाहने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.

सीसीटीव्ही बसवावेत, नागरिकांची मागणी

गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संरक्षक कठडे बसवण्याची मागणी

माजलगाव : येथील धरण बघण्यासाठी पर्यटक येतात. अनेक लोक पाण्यात उतरून फोटो काढतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. संरक्षक कठडे बसविण्यासह बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी होत आहे.

पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त

वडवणी : शहरातील मुख्य भागातील तसेच गल्ली बोळातील काही भागात रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालणे अवघड होऊन बसले आहे. तसेच भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.

Web Title: Kingdom of dirt in the stadium area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.