भाज्यांचे भाव वधारल्याने कीचन बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:43 AM2019-03-25T00:43:45+5:302019-03-25T00:44:39+5:30

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई आहे. परिणामी तालुक्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचे कीचन बजेट कोलमडले आहे.

The kitcha budget collapsed after rising prices of vegetables | भाज्यांचे भाव वधारल्याने कीचन बजेट कोलमडले

भाज्यांचे भाव वधारल्याने कीचन बजेट कोलमडले

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईचा परिणाम : पाणीपातळी खालावल्याने भाजी उत्पादनात घट; आवक कमी होत असल्याने भाव वाढले

गेवराई : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई आहे. परिणामी तालुक्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचे कीचन बजेट कोलमडले आहे.
सध्या मेथी पालक आणि शेपूची आवक घटली आहे. टंचाईमुळे दिवसेंदिवस भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत प्रतिकिलोचे दर किमान ६० ते ८० रुपयांच्या घरात आहेत यामध्ये वांगी ४० दोङका ६०, भेंडी ६०, गवार ८० रूपये प्रति किलो फूलकोबी २० रूपये नग पानकोबी १५ रूपये नग, कारले ६० रूपये किलो कोथिंबीर १० रूपये चार नग शेपू भाजी २० रूपये पेंढी, हिरवी मिरची ६० रूपये किलो कांदे १५ ते २० रूपये, बटाटे २० रूपये, शेवग्याची शेंग ५० रूपये किलो, हिरवा वाटाणा ४० रूपये किलो असे दर आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे असलेल्या विहिरी आणि विंधन विहिरीची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. परिणामी तालुक्यातील गेवराई, हिरापूर, तलवाडा, सिरसदेवी, पाचेगाव, उमापूर आठवडी बाजारात आठ दिवसांपासून हिरव्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर दिसत आहे.

Web Title: The kitcha budget collapsed after rising prices of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.