कोविडच्या लढाईत शिक्षकांनी उचलला खारीचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:49+5:302021-05-19T04:34:49+5:30
कुसलंब : ककेरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. आरोग्य सुविधा व उपचारांची साधने कमी पडू लागली आहेत. सरकारी यंत्रणेवर कमालीचा ...
कुसलंब : ककेरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. आरोग्य सुविधा व उपचारांची साधने कमी पडू लागली आहेत. सरकारी यंत्रणेवर कमालीचा ताण आलेला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, त्या वेळेला देशातील शिक्षक बांधवांचे योगदान फार महत्त्वाचे राहिले आहे. देशावरील संकट असो की मानवतेवरील संकट असो, शिक्षक बांधव आपला खारीचा वाटा उचलता असतो.
कोरोनाच्या या लढाईत शिक्षक कोरोना योध्दा म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेतच.
संकटाच्या या दिवसात आपणही सामाजिक बांधिलकीच्या भावनेने खारीचा वाटा उचलावा, या हेतूने कुसंळब केंद्रातील शिक्षक बांधवांनी विस्तार अधिकारी हनुमंत गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुसळंब येथील खंडेश्वर विद्यालयातील कोरोना सेंटर येथे एक दिवसाचे पोष्टिक जेवण व पूरक आहार म्हणून अंडी वाटप करण्यात आली. तसेच कोविड सेंटरला आर्थिक मदत म्हणून २१ हजार रुपये देणगी देण्यात आली.
केंद्र कुसळंब नावाच्या व्हाॅट्सॲप माध्यमातून सर्व शिक्षक बांधवांनी एकवीस हजार पाचशे रुपये वर्गणी गोळा करून हा उपक्रम राबविला.
याप्रसंगी कुसळंब केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी हनुमंत गव्हाणे, माजी सरपंच बाळासाहेब पवार, मेजर सरपंच शिवाजी पवार, खंडेश्वर विद्यालयाचे प्राचार्य एस. के.पवार, आबासाहेब पवार, डॉ. शिवाजी पवार,
प्रा. संजय गायकवाड, बाबु धारक,
शिक्षक राजाराम डोंगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पाटोदाचे अध्यक्ष पोपट साबळे, मुख्याध्यापक किरण पेचे, सुभाष चव्हाण, उमाकांत अंकुशे हे उपस्थित होते. कुसळंब केंद्रातील शिक्षकांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी व एक शिक्षकांविषयीचा दृष्टिकोन बदलणारा आहे. त्यामुळे सर्वस्तरातून शिक्षक बांधवांचे कौतुक करण्यात येत आहे.
===Photopath===
180521\img_20210517_122839_763_14.jpg