इस्कॉनच्या राधागोविंद मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:29 AM2019-08-26T00:29:07+5:302019-08-26T00:30:25+5:30
हरे कृष्णा...हरे रामा...रामा रामा हरे कृष्णा...अशा सूर तालात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या येथील श्री श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
बीड : हरे कृष्णा...हरे रामा...रामा रामा हरे कृष्णा...अशा सूर तालात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या येथील श्री श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
१८ ते २५ आॅगस्टदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले होते. तसेच प्रवक्ते भगवान प्रभुजी यांच्या मधुर वाणीत श्रीमद्भागवत कथेचे आयोजन केले होते. २३ व २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा ते रात्री एक वाजेपर्यंत भजन संध्या, श्रीकृष्ण कथा, अध्यात्मिक नाटिका, भगवंतांचा महाभिषेक करण्यात आला. महोत्सवानिमित्त अध्यात्मिक ग्रंथ भांडार, आध्यात्मिक साहित्य भांडार, युवा प्रचार केंद्र स्थापित केले होते. २५ रोजी संस्थेचे संस्थापक आचार्य यांचा १२३ व्याअविर्भाव दिनानिमित्त सकाळपासून कीर्तन, शब्दांजली, महापुष्प, अभिषेक, प्रवचन, महाआरती आणि त्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष विठ्ठल आनंद प्रभू, उपाध्यक्ष यादवेंद्र प्रभू, मंदिराचे मुख्य पुजारी कृष्णनाम प्रभू व सर्व दीक्षित ग्रहस्थ भक्तांनी परिश्रम घेतले. तीन दिवस महोत्सव उत्साहात आनंदात पार पडला,
यानिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमासह दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याची माहिती इस्कॉन बीडचे श्रीमान कृष्ण नामदास यांनी दिली.