बीडमध्ये घुमला कृष्णनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:42+5:302021-09-27T04:36:42+5:30
बीड : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन संस्थेच्या श्री श्री राधा गोविंद मंदिराच्या वतीने हरेकृष्ण नामाच्या गजरात जागतिक हरिनाम ...
बीड : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन संस्थेच्या श्री श्री राधा गोविंद मंदिराच्या वतीने हरेकृष्ण नामाच्या गजरात जागतिक हरिनाम महोत्सव शहरातील विविध भागांमध्ये हरिनाम संकीर्तनातून उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची नुकतीच सांगता झाली.
इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रीमद् ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या अविर्भावाच्या १२५ व्या वर्षानिमित्त तसेच जागतिक हरिनाम महोत्सवाच्या २५ व्या वर्षानिमित्त दररोज सकाळी ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम राम राम हरे हरे’या महामंत्राचा जयघोष करत हरी नाम संकीर्तन काढण्यात आले. भाविकांनीही हात उंचावत सहभाग नोंदविला. बीड शहरातील माळीवेस,सुभाष रोड,पोस्टमन कॉलनी, शिक्षक कॉलनी ,यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, माळीवेस ते जटाशंकर महादेव परिसर,नाळवंडी नाका,पांगरी रोड, पिताजी आयकॉन परिसर,भाजी मंडई परिसर, आहेर वडगाव येथील काटेवाडी, शिदोड व अंबाजोगाई इत्यादी भागांमध्ये कृष्णनामाचा गजर झाला.
या उपक्रमात मंदिराचे अध्यक्ष विठ्ठलानंद प्रभू,यादवेंद्र प्रभू ,साधू कृपा प्रभू, मत्स्य अवतार प्रभू, वैकुंठ पुरुष प्रभू,राधिका जीवन प्रभू, विद्यापती प्रभू, द्वारकेश प्रभू, गोप किशोर प्रभू, कौंतेय सारथी प्रभू, भक्त अतुल रसिक भक्त प्रभू व राधा गोविंद मंदिरातील इतर सर्व भक्तगणांचा विशेष सहभाग लाभला.‘हरे कृष्ण भाग्यवान जीव’ अभियानांतर्गत जगाच्या कल्याणासाठी व मानव समाजाच्या शांततेसाठी हरिनाम महाेत्सवाचे आयोजन केल्याचे इस्कॉन बीडचे प्रतिनिधी श्रीमान कृष्ण नामदास यांनी सांगितले.
260921\26_2_bed_3_26092021_14.jpg
हरिनाम सप्ताह