पाटोदया जवळील अपघातात हापसीवाले क्षीरसागर सह दोघे ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:13 PM2018-01-04T19:13:35+5:302018-01-04T19:53:37+5:30

शहराजवळ काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार झाली आहेत. यात दुष्काळात पाटोदेकरांची तहान भागवणारे माजी जिप सदस्य नारायण क्षीरसागर यांचा समावेश आहे.

Kshirsagar n other two people killed in a road accident near Patoda | पाटोदया जवळील अपघातात हापसीवाले क्षीरसागर सह दोघे ठार 

पाटोदया जवळील अपघातात हापसीवाले क्षीरसागर सह दोघे ठार 

googlenewsNext

पाटोदा (बीड) : शहराजवळ काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार झाली आहेत. यात दुष्काळात पाटोदेकरांची तहान भागवणारे माजी जिप सदस्य नारायण क्षीरसागर यांचा समावेश आहे.

मूळचे रायमोह येथील रहिवाशी व पाटोदा येथे स्थायीक  असलेले क्षीरसागर हे कालरात्री बीडहून त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक कैलास जाधवसह पाटोद्याला येत होते. रात्री ११.३० च्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील जवळा पाटीजवळ त्यांची कार वडाच्या झाडावर आदली. यात  जाधव जागीच ठार झाले तर क्षीरसागर गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना बीडला नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

दुस-या एका घटनेत तरुण ठार 
आष्टी येथील सतीश टेकाडे हा तरुण दुचाकीवरून पाटोद्याकडे येत असताना चुंबळी फाटयाजवळ त्याच्या गाडीस कोल्हा आडवा. यावेळी कोल्ह्यास गाडीची धडक दिल्याने तो तोल जाऊन पडला. त्याच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारास नगरकडे घेऊन जात असताना त्याचे निधन झाले. 

हापसीवाले नारायण क्षीरसागर
कार अपघातात ठार झालेले नारायण क्षीरसागर यांनी पाटोदा व रायमोह येथून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. या काळात पाणीटंचाईवर मत करण्यावर त्यांचा विशेष भर होता. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून या भागात हातपंपाचे जाळे निर्माण करून नागरिकांची तहान भागवली. यामुळे तालुक्यात त्यांना हापसीवाले म्हणून ओळले जात असे.

Web Title: Kshirsagar n other two people killed in a road accident near Patoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.