केएसकेमध्ये रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी ऑनलाईन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:16+5:302021-08-25T04:38:16+5:30

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन बीड : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा, बीड, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान ...

KSK to host stand-up comedy online competition | केएसकेमध्ये रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी ऑनलाईन स्पर्धा

केएसकेमध्ये रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी ऑनलाईन स्पर्धा

Next

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

बीड : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा, बीड, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग आणि फुल फिल्म इंटरटेनमेंटच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्ट रोजी स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केल्याची माहिती नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी दिली.

शहरातील के. एस. के. महाविद्यालयाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्त विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फुल फिल्म इंटरटेनमेंट या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्टॅन्ड अप कॉमेडीची ऑनलाईन स्पर्धा ठेवण्यात आली आहे.

प्रेक्षकांसाठी दोन दिवस आधी लिंक दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, अंकुर तांगडे, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी सांगितले. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. ए. एस. हांगे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, क.म.वि. उपप्राचार्य एल. एन. सय्यद, पर्यवेक्षक जे. यु. कोळेकर, प्रा. दुष्यंता रामटेके यांनी केले आहे.

------

देशभरातून ५५ स्पर्धकांची नोंदणी

यासाठी देशभरातून ५५ स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून त्यातील १५ मराठी व १५ हिंदी स्पर्थकांना संधी मिळणार आहे. यातून दोन मराठी व दोन हिंदी स्पर्धकांना रोख पारितोषिक दिली जातील. ऑनलाईन होणाऱ्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेते योगेश शिरसाठ, अंकूर वाढवे, अभिनेत्री पूजा ठोंबरे हे काम पाहणार आहेत.

-------

Web Title: KSK to host stand-up comedy online competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.