के.एस.के. महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:09+5:302021-02-07T04:31:09+5:30
बीड : के.एस.के.महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'मानवी कल्याणासाठी जीवविज्ञान' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात ...
बीड : के.एस.के.महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'मानवी कल्याणासाठी जीवविज्ञान' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर या होत्या.
या चर्चासत्राप्रसंगी डॉ.अशोक चव्हाण यांनी सूक्ष्मजीवांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांनी वैज्ञानिक संशोधन व त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयुक्तता यांचे महत्त्व या विषयावर प्रकाश टाकला. या चर्चासत्रात डॉ.राम चव्हाण, डॉ.एन.जी. काशीद यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासाठी देशभरातून १६५ प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.एस.हंगे, उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर, डॉ.राजा मचाले, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालींदर कोळेकर यांची उपस्थिती होती. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष तळेकर, डॉ. अनिल शेळके, डॉ. संध्या जोगदंड, डॉ. प्रेमचंद सिरसट, डॉ. पाटील, . सिध्दार्थ जाधव यांनी परिश्रम घेतले.