पूरग्रस्तांच्या मदतीला धावला कुटे ग्रुप फाउंडेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:20+5:302021-08-01T04:31:20+5:30
बीड : खाद्यतेल, कोकोनट ऑईल, डेअरी आणि इतर उद्योगांत आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड बनलेला कुटे उद्योग समूह नेहमीप्रमाणे आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून ...
बीड : खाद्यतेल, कोकोनट ऑईल, डेअरी आणि इतर उद्योगांत आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड बनलेला कुटे उद्योग समूह नेहमीप्रमाणे आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पाच हजार पूरग्रस्त कुटुंबांना थेट मदत करणार आहे. मदतीची वाहने बीडहून शनिवारी रवाना झाली असल्याची माहिती कुटे उद्योग समूहाच्या अर्चना सुरेश कुटे यांनी दिली.
बीड येथे कुटे परिवाराने प्रचंड परिश्रमातून खाद्यतेल उत्पादनाचा प्रकल्प उभा केला. परिश्रमाला प्रामाणिकपणाची जोड देत गुणवत्ता जपली. यामुळे बघता बघता कुटे उद्योग समूहाची उत्पादने आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड बनली. एकीकडे उद्योग-व्यवसायात भरारी घेत असतानाच सुरेश कुटे, अर्चना कुटे, आर्यन कुटे यांनी कुटे ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जपली आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात कुटे ग्रुप फाउंडेशनने हजारो कुटुंबांना अन्नधान्य आणि किराणा साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच पोलीस मुख्यालयातील कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लँट उभा करून गरजूंना याचा लाभ दिला. कोकणातील आपत्तीच्या काळात नेहमीप्रमाणे कुटे उद्योग समूह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. कुटुंबातील व्यक्तींना नवीन कपडे, टॉवेल, सतरंजी, ऊबदार शाल, हळद, मिृीठ, जिरे इथपासून खाद्यतेल, वापराचे तेल, साबण, टुथपेस्ट, अशा जीवनावश्यक सतरा वस्तू, अन्नधान्य याच्या पाच हजार किट तयार करून त्या पूरग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहेत. (वाणिज्य वार्ता)
मदतीचा महायज्ञ सुरूच : अर्चना सुरेश कुटे
कोरोना संकटकाळात प्रशासनाबरोबर राहून कुटे ग्रुप फाउंडेशनने ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा उभी केली. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी स्व. ज्ञानोबाराव कुटे यांच्या स्मरणार्थ अन्नछत्र उभे करून दररोज शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांच्या भोजनाची व्यवस्था केली. गत दोन वर्षांपूवीं सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले होते. या ठिकाणी ग्रुपच्या सदस्यांनी जाऊन मदत केली होती. आताही अनेक जिल्हे पाण्यामुळे बाधित झाले आहेत. पाच जिल्ह्यांत पाच हजार कुटुंबांना कुटे ग्रुप फाउंडेशनच्या वतीने एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य, ऊबदार कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे यासह जीवनावश्यक असलेल्या साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
अर्चना सुरेश कुटे (मॅनेजिंग डायरेक्टर, कुटे ग्रुप)