हंगामाआधीच मजुरांच्या सुविधांची तयारी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:53+5:302021-08-27T04:35:53+5:30
सुरेश धस यांची मागणी : साखर आयुक्तांसोबत विविध समस्यांवर केली चर्चा आष्टी : आगामी गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांच्या सुविधांबाबत ...
सुरेश धस यांची मागणी : साखर आयुक्तांसोबत विविध समस्यांवर केली चर्चा
आष्टी : आगामी गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांच्या सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी बीड, लातूर, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी पुणे येथील साखर संकुलात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन केली.
राज्य सरकार, कारखानदार व साखर संघामार्फत गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांना कोणकोणत्या सामाजिक सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून देणार आहेत, या विषयावर धस यांनी चर्चा केली. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखाना स्थळावर (स्थानिक ठिकाणी) महिलांसाठी आयुर्मंगलम योजनेचा नव्याने प्रारंभ करून त्यांना आरोग्यकवच देण्यात यावे, ऊसतोडणी कामगारांचे सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे होत आली; पण अद्याप ऊसतोडणी मजुरांची नोंदणी व आकडेवारी संकलित करण्यासाठी दिरंगाई का केली जात आहे, अशा अनेक समस्या, मुद्द्यांवर सविस्तर चर्चा आ. धस आणि साखर आयुक्तांनी केली.
-----
कल्याणकारी मंडळाचे अद्याप काम सुरू नाही
ऊसतोड कामगारांच्या कल्याणकारी महामंडळाची अद्याप कोणतीही हालचाल व अंमलबजावणी सुरू नाही. राज्य सरकार तीन महिन्यांत ऊसतोड मजुरांचा कायदा करणार होते. मात्र, अद्याप जैसे थे परिस्थिती आहे. कायद्याची घोषणा होऊन विधिमंडळाची तीन अधिवेशने यादरम्यान झाली आहेत. तरीदेखील, अद्याप कायदा होऊ शकला नाही. ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्यासाठी उपसभापती नीलमताई गोऱ्हे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आरोग्य प्रशासनाकडून अद्याप होताना दिसत नसल्याचेही आ. सुरेश धस म्हणाले.
---------
250821\5715img-20210825-wa0329_14.jpg