झोपेतील गवंड्याच्या डोक्यात दगड घालून मजुराने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 03:54 PM2020-11-26T15:54:23+5:302020-11-26T15:55:35+5:30

आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील घटना 

The laborer committed murder by throwing a stone at the head of a sleeping bricklayer | झोपेतील गवंड्याच्या डोक्यात दगड घालून मजुराने केला खून

झोपेतील गवंड्याच्या डोक्यात दगड घालून मजुराने केला खून

Next
ठळक मुद्देआरोपी मजूर कांतीलाल मारूती काकडे पोलिसांच्या ताब्यात

कडा- गाढ झोपेत असलेल्या गवंड्याच्या डोक्यात दगड घालून मजुरानेच खून केल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. ईश्वर दत्तु नवसुपे ( २७ ) असे मृत गवंड्याचे नाव असून आरोपी मजूर कांतीलाल मारूती काकडे (४० ) यास अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील वाळके अनारसे वस्तीवर गोरख नारायण पाचारणे हे त्यांच्या घराचे बांधकाम  सुरु आहे. हे काम मंगरूळ येथील गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे आणि मजूर कांतीलाल मारूती काकडे करत आहेत.  दोघेही बुधवारी काम आटोपून बांधकावरच झोपले होते. गुरूवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान मजूर कांतीलाल याने गाढ झोपेतील ईश्वर नवसुपे यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर मजुराने घराच्या मालकाच्या चारचाकी कारवरही ( MH.02,DJ.2574 ) दगडफेक केली. 

घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोंखडे, पोलिस हवालदार राजेंद काकडे,  पोलिस कर्मचारी चंद्रकांत काळकुटे, गंगाधर अॅग्रे, संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी कांतीलाल याला ताब्यात घेत गंभीर जखमी ईश्वर यास लागलीच अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गोरख नारायण पाचारणे यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहे. 

Web Title: The laborer committed murder by throwing a stone at the head of a sleeping bricklayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.