बससेवा नसल्याने विद्यार्थी, जेष्ठांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:43+5:302021-01-18T04:30:43+5:30
ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरळीत नाही, खेड्या -पाड्याच्या रस्त्यावर प्रवासाला बसशिवाय पर्याय नाही-सुरक्षित व वेळेत ये-जा करणाऱ्या बसमुळे प्रवाशांना ...
ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरळीत नाही, खेड्या -पाड्याच्या रस्त्यावर प्रवासाला बसशिवाय पर्याय नाही-सुरक्षित व वेळेत ये-जा करणाऱ्या बसमुळे प्रवाशांना आधार होतो. कोरोना लॉकडाऊनंतर आता शहरी भागातील बससेवा सुरळीत झालेली असताना ग्रामीण भागात मात्र बस बंदच आहे. काही महिन्यांपासून शासनाने ९ वी ते १२ वी पर्यंत वर्ग सुरू केले आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बससेवा नसल्याने अडचणी येत आहेत. याचाच फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे उचलत असुन प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशी भरून वाहतूक सुरू आहे अशा वाहनातून प्रवास करताना विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. माजलगाव आगाराने प्रवाशाच्या मागणीनुसार ग्रामीण भागातील बससेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आळणे यांच्यासह विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.