सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:24+5:302021-02-07T04:31:24+5:30

विजेचा लपंडाव अंबाजोगाई : शहर व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीज ...

Lack of facilities | सुविधांचा अभाव

सुविधांचा अभाव

Next

विजेचा लपंडाव

अंबाजोगाई : शहर व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारपेठेला याचा फटका बसत आहे.

नियमांची ऐशीतैशी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय.

रस्ता दुरुस्त करा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत अद्यापही लक्ष दिले जात नाही.

बस सुरू करा

अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अ‍ॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.

धारूर स्थानकासमोर पार्किंग दिसेना

धारूर : धारूर बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजबारा उडाला आहे. सर्रास या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणीची मागणी आहे.

बीड बसस्थानकात खड्ड्यांचा त्रास वाढला

बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्यस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

Web Title: Lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.