लोखंडीच्या कोविड रुग्णालयात गोळ्या, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:55+5:302021-05-05T04:54:55+5:30
याकडे जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांचे या रुग्णालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता ...
याकडे जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांचे या रुग्णालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी लोखंडीच्या रुग्णालयात त्वरित औषधी आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
नवी इमारत आणि सर्व सुविधा असल्याने लोखंडीच्या रुग्णालयाकडे आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा वाढला आहे. सध्या या येथील दोन्ही इमारतीत मिळून सातशेपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. येथील डॉक्टरही तज्ज्ञ आहेत; परंतु अत्यावश्यक औषधी उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन लोखंडीच्या रुग्णालयात फॅबिफ्ल्यू गोळ्या आणि इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे.