दरपत्रकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:23 AM2021-01-01T04:23:19+5:302021-01-01T04:23:19+5:30
पिकांना पाणी मिळेना बीड : रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे ...
पिकांना पाणी मिळेना
बीड : रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. वेळेवर व सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत, तसेच बहुतांश वेळा थ्रीफेज असणारी वीज ही रात्री सोडली जाते. त्यामुळेदेखील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसा वीज देण्याची मागणी आहे.
वाहने खिळखिळी
अंबाजोगाई : तालुक्यात पिंपळा ते यशवंतराव चौक, लोखंडी सावरगाव ते केज या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते उखडून ठेवले आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने आदळून आदळून दुचाकी व चारचाकी गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. गाड्यांबरोबरच माणसांची अवस्था तशीच होऊ लागली आहे.