लालपरी उद्यापासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:47+5:302021-06-06T04:25:47+5:30

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाची बीड जिल्ह्यातील बस वाहतूक तब्बल अडीच महिने ...

Lalpari will run from tomorrow | लालपरी उद्यापासून धावणार

लालपरी उद्यापासून धावणार

Next

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाची बीड जिल्ह्यातील बस वाहतूक तब्बल अडीच महिने बंद होती. कोराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार ७ जूनपासून एस.टी. बससेवा जिल्ह्यातील आगारातून सुरु करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी सांगितले. ७ जूनपासून आगारनिहाय सुटणाऱ्या बस

१ ) बीड – परळी, नांदेड, परभणी, अंबाजोगाई, लातूर, औरंगाबाद, जालना, सोलापूर, पुणे, मुंबई

२ ) परळी - बीड , परभणी , लातूर, अंबाजोगाई, नांदेड , सोनपेठ

३ ) धारुर - बीड , अंबाजोगाई , केज , तेलगाव , पुणे

४ ) माजलगाव – लातूर , परळी , परभणी , नांदेड , सोलापूर , कोल्हापूर , बीड – मुंबई , गेवराई , आष्टी

५ ) गेवराई – माजलगाव , परभणी , नांदेड , शेवगाव , पुणे , जालना , औरंगाबाद

६ ) पाटोदा – पुणे , बीड , परळी , मुंबई

७ ) आष्टी –पुणे , स्वारगेट , नगर , मुंबई , बीड

८ ) अंबाजोगाई – बीड , परळी , औरंगाबाद , लातूर , अहमदपूर , पुणे , धारुर , परभणी

प्रतिसादानंतर बस सेवेचा विस्तार

या सेवेस मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन अन्य मार्गावर विस्तारित बससेवा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांनी एस. टी. बसमध्ये प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर वापरावे. शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करावे व राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा. - कालिदास लांडगे, विभाग नियंत्रक, बीड

Web Title: Lalpari will run from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.