जमिनीच्या वादातून एकमेकांचे पीक जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:57+5:302021-04-26T04:30:57+5:30
गेवराई : तालुक्यातील बागपिंपळगाव येथे काका-पुतण्यातील वाद शिगेला पोहोचला. दोन गट समोरासमोर भिडले. यात दोघांनीही एकमेकांची पिके जाळली. परस्परविरोधी ...
गेवराई : तालुक्यातील बागपिंपळगाव येथे काका-पुतण्यातील वाद शिगेला पोहोचला. दोन गट समोरासमोर भिडले. यात दोघांनीही एकमेकांची पिके जाळली. परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
श्रीनिवास बाजीराव देवकते (रा.बागपिंपळगाव कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, काका-पुतण्यात जमिनीचा वाद सुरू असून, तो न्यायप्रविष्ठ आहे. दावा मागे का घेत नाही, अशी कुरापत काढून २३ रोजी गट क्र. ४९ व ५० मध्ये त्यांचा आठ हजार किमतीचा ऊस जाळून नुकसान केले. या प्रकरणी चैतन्य परमेश्वर देवकते, परमेश्वर बाबूराव देवकते, शोभा परमेश्वर देवकते, लिंबाजी बाबूराव देवकते, दीपक लिंबाजी देवकते, गणेश बाबूराव देवकते यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. परमेश्वर बाबूराव देवकते यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, जमिनीचा दावा काढून का घेत नाही म्हणून त्यांचा गहू व गव्हाचे भुसकट तसेच कडब्याची गंज जाळून दहा हजार रुपयांचे नुकसान केले. श्रीनिवास बाजीराव देवकते, सारिका श्रीनिवास देवकते यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
....