मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:11+5:302021-02-06T05:04:11+5:30
बसस्थानकात स्वच्छतेची मागणी केज : येथील बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, याकडे आगार ...
बसस्थानकात स्वच्छतेची मागणी
केज : येथील बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, याकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. घाणीमुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. परिसर स्वच्छतेची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात अवैध धंदे बोकाळले
जातेगाव : गेवराई तालुक्यात जातेगाव हे सर्कलचे गाव आहे. या ठिकाणी आठवडी बाजार गुरुवारी भरला जातो. या दिवशी टपरी व किराणा दुकानांवर सर्रास गुटखा सुरु असते. तसेच अवैध धंदे, अवैद्य देशी-विदेशी दारु, अवैध वाहतूक मटका आदी धंदे जोरात सुरू आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी येत असून, स्वच्छतेची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
टायमर स्वीच खराब
पाडळसिंगी : गावातील अनेक भागात काही दिवसांपासून पथदिवे दिवसाही सुरूच राहत असल्याचे दिसून येत आहेत. खांबावरील टायमर स्वीच खराब झाल्याने पथदिवे तसेच सुरू राहत आहेत. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन पथदिवे वेळेवर सुरु व बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. परंतु याकडे अद्यापही दुर्लक्षच केले जात आहे.
भुरट्या चोऱ्यांत वाढ
पाटोदा : शहर व परिसरात भूरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरांसमोर कोणी नसल्याचा फायदा घेत चोरटे हात साफ करतात. वापरासाठी आवश्यक परंतू फारशी किंमत नसल्याने लोकही तक्रार करत नाहीत. घरास कुलूप लाऊन बाहेर पडणे जोखमीचे झाले आहे. गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. या रस्त्यावरून जाताना झाडांच्या फांद्या आणि काटे प्रवाशांना बोचत आहेत. यातून अपघाताचा धोका नाकारता येत नाही. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.
वाळूची तस्करी
बीड : केज तालुक्यातील बेलगाव, काळेगाव परिसरातील नदी पात्रातील गावामध्ये व गावाबाहेर वाळू साठे करून वाळुचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. या वाळू माफियांवर कार्यवाही न करता महसूल, पोलीस प्रशासन गप्प दिसत आहे. वाळूची चढ्या भावाने वाळू विक्री केली जात आहे.