कार्यालयात उशीर; कर्मचाऱ्यांचे वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:51 PM2020-03-03T22:51:43+5:302020-03-03T22:52:26+5:30

येथील नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी सोमवारी वेळेत कार्यालयात आले नव्हते. ‘लोकमत’ने स्टिंग करून हा प्रकार निदर्शनास आणला होता.

Late in the office; Salary reduction of employees | कार्यालयात उशीर; कर्मचाऱ्यांचे वेतन कपात

कार्यालयात उशीर; कर्मचाऱ्यांचे वेतन कपात

Next
ठळक मुद्देबीड पालिका : ‘लोकमत’च्या स्टिंगनंतर सीओंनी मागविला अहवाल

बीड : येथील नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी सोमवारी वेळेत कार्यालयात आले नव्हते. ‘लोकमत’ने स्टिंग करून हा प्रकार निदर्शनास आणला होता. यावर मुख्याधिकारी अहवाल मागविला असून उशिरा येणाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई केली जाणार आहे. मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी ही माहिती दिली.
२९ फेब्रुवारी पासून पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. शनिवारची सुट्टी झाल्यानंतर सोमवारी याचा दुसरा तर आठवड्याचा पहिला दिवस होता. सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी ९.४५ वाजता कार्यालयात येऊन कामकाजाला सुरूवात करणे अपेक्षित होते. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने सकाळीच जावून हजेरी पुस्तीका तपासली असता केवळ १९ कर्मचारी वेळेत आले होते. वेळेत येणाºयांची नावेही ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु जे उशिराने कार्यालयात आले, अशांची यादी कार्यालयीन अधीक्षकांकडून मागविण्यात आली आहे. यापूर्वीच नोटीस बजावलेली असल्याने त्यांच्यावर थेट वेतन कपातीची कारवाई करणार असल्याचे सीओ गुट्टे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, मंगळवारी ‘लोकमत’चे वृत्त पाहताच अधिकारी, कर्मचारी सकाळी वेळेत कार्यालयात हजर झाले. ‘स्टिंग’च्या धास्तीने सर्वच जण कक्षात बसून काम करत होते.

Web Title: Late in the office; Salary reduction of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.