धारूर महाविद्यालयात कै.रामराव आवरगावकर पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:05+5:302021-02-09T04:36:05+5:30
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य मेजर डॉ मिलिंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा महादेव जोगडे यांनी व महाविद्यालयातील सर्व ...
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य मेजर डॉ मिलिंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा महादेव जोगडे यांनी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले. कै.रामरावजी आवरगावकर यांचे जीवन व कार्य या विषयावर उपप्राचार्य डॉ गायकवाड यांनी व प्रा डॉ डी एन गंजेवार यांनी धारूर व परिसराच्या विकासात व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विकासात योगदान तसेच एस टी महामंडळ डेपो निर्मितीत त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख केला. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ यांनी केला. प्राचार्य शिरसाठ म्हणाले की कै.रामराव आवरगावकर यांनी बहुजन सुखाय व बहुजन हिताय या वैश्विक हेतूने धारूर महाविद्यालयाची स्थापना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ नितीन कुंभार यांनी तर आभार प्रा डॉ राम भोसले यांनी मानले.