फुलसांगवीत ३४ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:30 AM2021-02-07T04:30:49+5:302021-02-07T04:30:49+5:30

संदीप क्षीरसागर : विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही बीड : फुलसांगवी परिसरातील नागरिकांनी स्व. काकू-नानांपासून साथ दिली आहे. ...

Launch of development works worth Rs. 34 lakhs in Phulsangvi | फुलसांगवीत ३४ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

फुलसांगवीत ३४ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

Next

संदीप क्षीरसागर : विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

बीड : फुलसांगवी परिसरातील नागरिकांनी स्व. काकू-नानांपासून साथ दिली आहे. यापुढेही आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या. या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.

श्री क्षेत्र वामनभाऊ संस्थान फुलसांगवी येथील अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून आशीर्वाद घेतल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर बोलत होते. निवडणुकीत दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांसाठी २५ लाख व इतर विकासकामांसाठी ९ असा एकूण ३४ लाख रुपयांचा विकास निधी दिला.

वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर आश्रम खांबालिंबा व श्री क्षेत्र वामनभाऊ संस्थान फुलसांगवी व खोकरमोहा येथील अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून आमदार संदीप क्षीरसागर यांनी आशीर्वाद घेतले. फुलसांगवी येथे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची जाणीव ग्रामस्थांनी करून दिल्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फुलसांगवी येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला नवीन खोली बांधकामासाठी २५ लाख, सिमेंट रस्ता ३ लाख, सौर पथ दिवे ३ लाख, व्यायाम शाळा ३ लाख असा एकूण ३४ लाख रुपयांच्या निधीचे पत्र फुलसांगवी येथील ग्रामस्थांच्या स्वाधीन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मदन जाधव, पंचायत समिती सदस्य माऊली सानप, जीवनराव जोगदंड, माजी सरपंच भास्कर सानप, अविनाश सानप, जगू मार्कंड, अप्पा उगले, अशोक देवकते यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Launch of development works worth Rs. 34 lakhs in Phulsangvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.