शिरूरमध्ये स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:10+5:302021-07-20T04:23:10+5:30
शिरूर कासार : स्वच्छ शहर सुंदर शहर तसेच हरित शहर हे घोषवाक्य घेऊन नगरपंचायत व सोशल लॅब यांच्या संयुक्त ...
शिरूर कासार : स्वच्छ शहर सुंदर शहर तसेच हरित शहर हे घोषवाक्य घेऊन नगरपंचायत व सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ सोमवारी प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील व माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ लेखापाल चंद्रकांत दामोधर सह मा. नगरसेवक गणेश भांडेकर ,अन्वर शेख ,आनंद जावळे सह गोकुळ पवार ,नामदेव घुगे ,संजय गायकवाड ,कौसर शेख ,सुनील शेटे ,अक्षय सुरवसे ,लक्ष्मण थोरात ,शहादेव गायकवाड ,गणेश कातखडे उपस्थित होते .
सोमवारी स्वच्छतेपासून सुरू झालेल्या या पंधरवड्यात क्रमश वृक्षारोपण,कचरा कंपोस्टिंग वर्कशाॅप ,स्लोगन ,महिला वैयक्तिक स्वच्छता मार्गदर्शन , रांगोळी स्पर्धा,रेन वाॅटर हार्वेस्टिंग ,वकृत्व स्पर्धा ,सफाई कर्मचारी आरोग्य शिबिर ,सायकल रॅली,प्लास्टिक बंदी मोहीम ,काॅर्नर मिटिंग,पथनाट्य दोन दिवस करून समारोप ४ ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयात होणार असल्याचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.
स्वच्छता दिंडीचे प्रमुख भोई
नगरपंचायत बरोबर सोशल लॅबची सर्व टीम या स्वच्छता दिंडीचे भोई म्हणून काम करणार आहेत. त्यात बालाजी कदम ,गणेश गोरमाळी ,मन्सूर शेख ,सागर कुंभार ,रेखा भोजने ,दर्शिका सोनवणे व रत्नमाला शिंदे यांचेसह महिला सफाई कामगार पंधरवाडा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणार आहेत .
190721\img20210719102638.jpg
फोटो
स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ प्रसंगी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पुजन करतांना