बीड तालुक्यातील १७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:31+5:302021-02-06T05:01:31+5:30
दरम्यान काही गावातील सरपंचपदाच्या आरक्षणात बदलदेखील झाले आहेत. बीड तालुक्यातील १७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित ...
दरम्यान काही गावातील सरपंचपदाच्या आरक्षणात बदलदेखील झाले आहेत. बीड तालुक्यातील १७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी २१ जागा देण्यात आल्या. यामध्ये पुरूषांसाठी ११ तर महिलांसाठी १० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ४७ जागांवर आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये पुरुष २४ तर महिलांना २३ जागांवर संधी देण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक जास्त जागा म्हणजेच १०५ सुटल्या असून यामध्ये पुरुषांसाठी ५३ तर महिलांसाठी ५२ जागा सुटल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या असून यामध्ये बोरखेड,वडवडी येथे पुरूष तर वासनवाडी येथे महिला सरपंच पदी विराजमान होणार आहेत.
या २३ ग्रामपंचायतींचे आरक्षण ‘जैसे थे’
खापर पांगरी, शहाजानपूर, सावरगाव घाट, नेकनुर, पेंडगाव, कर्जणी, वांगी, हिंगणी, लिंबारुई, काळेगाव, ताडसोन्ना या ग्रामपंचायत अनुसूचित जातींंच्या महिलांसाठी तर पिंपळगाव मोची, बाळापूर, नागापूर, कुंभारी, चांदणी, नामलगाव, घाटसावळी, पारगाव सुलतानपूर, वंजारवाडी, इमामपूर या ग्रामपंचायतने अनुसूचित जाती पुरुषांसाठी, तसेच बोरखेड अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी तर वासनवाडी अनुसूचित जमातीच्या पुरुषांसाठी आरक्षण जाहीर झालेले आहे. या २३ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘जैसे थे”च ठेवण्यात आलेले आहे.