अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:22+5:302021-08-01T04:31:22+5:30
मुप्टाच्यावतीने महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर व्हावा व महापुरुषांच्या विचाराचे समाजकार्य व्हावे, असे कार्य सातत्यपूर्वक केले जाते. ...
मुप्टाच्यावतीने महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर व्हावा व महापुरुषांच्या विचाराचे समाजकार्य व्हावे, असे कार्य सातत्यपूर्वक केले जाते. या व्याख्यानमालेत प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची व्याख्याने झाली. तर १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य विषयावर रवींद्र जोगदंड, २ ऑगस्ट रोजी ‘आरक्षण: सत्य आणि विपर्यास’ विषयावर प्रा. डॉ. अशोक नारनवरे यांचे व्याख्यान होईल. ३ रोजी ‘ओबीसी: अस्तित्वाचा लढा शक्य आहे’ या विषयावर डॉ. प्रल्हाद लुलेकर, ४ रोजी ‘नेतृत्वाची बदलती भूमिका आणि चळवळी समोरील आव्हाने’ विषयावर प्रा. डॉ. दयाराम मस्के आदींची व्याख्याने होणार आहेत. तरी या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी ऑनलाइन रोज सायंकाळी ८ वाजता संकेतस्थळावरून घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक प्रा. सुनील मगरे , प्रा.प्रदीप रोडे, प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा. डॉ. पंचशील एकंबेकर तसेच मुप्टाच्या मराठवाडा विभागातील पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.