धारूर महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रपर व्याख्यान संपन्न - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:02 AM2021-02-21T05:02:42+5:302021-02-21T05:02:42+5:30
धारूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त "चला शिवराय समजू या " या विषयावर व्याख्यान ...
धारूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त "चला शिवराय समजू या " या विषयावर व्याख्यान आयोजित केेले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ होते. यावेळी उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. महादेव जोगडे यांची उपस्थिती होती. यावेळी ज्ञानदेव काशिद म्हणाले, शिवाजी महाराजांच्या चारित्र्य, नीतिवंत, मुत्सद्दीपणा, प्रामाणिकपणा, शूरता, सामाजिक न्याय, रयतेबद्दल आपुलकी होती. आजच्या युवकांना महाराजांसारखे निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न आदर्श व प्रेरक जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खरे दीन- दलितांचे, दुबळ्याचे व रयतेच्या मनातील राजे होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन कुंभार यांनी तर प्रा. अनंथा गाडे यांनी आभार मानले.