छत्रपती शिवरायांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने जोपासावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:21 AM2021-02-22T04:21:52+5:302021-02-22T04:21:52+5:30
अंबाजोगाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने जोपासावा, असे आवाहन शिवव्याख्याते डाॅ. बालाजी जाधव यांनी ...
अंबाजोगाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीने जोपासावा, असे आवाहन शिवव्याख्याते डाॅ. बालाजी जाधव यांनी केले.
तालुक्यातील मगरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात ते बोलत होते. विचारमंचावर शिवव्याख्याते डाॅ. बालाजी जाधव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. नंदकिशोर सोमवंशी, उपसरपंच परसराम मगर, संभाजी वाळवटे, लहू शिंदे, विजयकुमार गंगणे, मोहन मगर आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली. जिजाऊ वंदनेनंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवव्याख्याते डाॅ. बालाजी जाधव म्हणाले, रयतेचे लोकमान्य राजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संबंध भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची प्रेरक गाथा आजच्या युवकांसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे आज घराघरात शिवचरित्रानुसार संस्कार झाले तर ते शिवकालीन उज्ज्वल दिवस पुन्हा परत आलेले दिसतील. गोविंद पोतंगले यांनी मगरवाडी येथील शिवजयंतीची माहिती दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. नंदकिशोर सोमवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजयकुमार गंगणे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत खुणे यांनी केले. गोविंद साठे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी मगरवाडी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, उपाध्यक्ष उमाजी मगर, प्रमोद शिंदे, प्रशांत शिंदे, ओंकार माने, स्वप्नील माने, पाडुरंग जाधव, राम माने, जोतीराम माने, ऋषिकेश इंगळे, भागवत मगर, बाळा साठेंसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.