सावकाराने कर्जदाराला पाजले विषारी द्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:03 AM2018-12-17T00:03:04+5:302018-12-17T00:04:55+5:30

पाच लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी १२ लाख व्याज देऊनही अधिक व्याजापोटी सावकाराने कर्जदार शेतकºयास गहाण जमिनीचा ताबा मागितला. शेतकºयाने नकार देताच सावकाराने त्याला विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना गेवराईत घडली.

The lender owes the borrower toxic liquid | सावकाराने कर्जदाराला पाजले विषारी द्रव

सावकाराने कर्जदाराला पाजले विषारी द्रव

Next
ठळक मुद्देगहाण जमिनीचा ताबा मागितला : शेतकऱ्याने नकार देताच केले कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पाच लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी १२ लाख व्याज देऊनही अधिक व्याजापोटी सावकाराने कर्जदार शेतकºयास गहाण जमिनीचा ताबा मागितला. शेतकºयाने नकार देताच सावकाराने त्याला विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना गेवराईत घडली.
येथील राजगल्ली भागात राहणारे सय्यद सलीम सय्यद बाबामियां यांनी वैयक्तिक कारणासाठी खाजगी सावकार मच्छिंद्र यशवंत आतकरे याच्याकडून पाच टक्के व्याजाने ५ लाख १० हजार रुपये घेतले होते. यासाठी त्यांनी १८ सप्टेंबर २०१२ रोजी भाऊ सय्यद बशीर बाबामियां यांच्या नावाच्या ५ एकर जमिनीचे खरेदीखत करुन दिले होते. त्यानंतर चार वर्षात त्यांनी व्याजापोटी अंदाजे १२ लाख रुपये आतकरेला दिले आहेत. ५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९.१५ वाजता आतकरे सय्यद सलीम यांच्या घराकडे आला आणि तुमच्या शेतात जाऊ असे म्हणाला.
नंतर दोघेही सय्यद सलीम यांच्या दुचाकीवरून जातेगाव रोडवरील दूध डेअरीजवळ आले. तिथे पूर्वीपासूनच दोन अनोळखी इसम थांबले होते. त्या ठिकाणी आतकरे याने सय्यद सामील यांच्याकडे आणखी एक व्याज दे अन्यथा तुझ्या जमिनीचा ताबा दे अशी मागणी केली. परंतु, यावर्षी दुष्काळ असल्याने व्याज देण्यास सय्यद सलीम यांनी असमर्थता दर्शविली. याचा राग आल्याने आतकरेने त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य दोघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. तेवढ्यात याला जिवेच मारुत असे म्हणत मच्छिंद्र आतकरेने सोबत आणलेली विषाची बाटली काढली आणि ते विष सय्यद सलीम यांच्या तोंडात बळजबरीने ओतले. यावेळी सय्यद सलीम यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून रस्त्याने जाणारे काही व्यक्ती तिकडे येऊ लागल्याने आतकरे आणि सोबतचे दोघे तिथून निघून गेले.
धावत आलेल्या लोकांनी सय्यद सलीम यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे त्यांनी गेवराई ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी सावकार मच्छिंद्र आतकरे आणि अनोळखी दोघांवर गेवराई ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: The lender owes the borrower toxic liquid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.