बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 02:04 PM2022-07-22T14:04:11+5:302022-07-22T14:04:29+5:30

आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात डोंगर असल्याने मागिल काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे.

Leopard again in Beed district; A goat was killed in a leopard attack in Sringeri Devi area in Ashti | बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल

googlenewsNext

आष्टी (बीड) : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता. तर बुधवारी काही ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करीत या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले आहे.

आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात डोंगर असल्याने मागिल काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. तर काही दिवसांपूर्वी आंबेवाडी येथील शेतकऱ्याची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. मात्र, वनविभागाकडून याबाबत ठोस माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, बुधवारी रात्री प्रवास करताना ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दरम्यान, वनविभागाने पाहणी करून या भागात या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले आहे. मागील दोन ते तीन महिन्यात बिबट्याने मनुष्यावर हल्ल्याची कोणतीही घटना नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. लहान मुलांवरती लक्ष ठेवावं, रात्री फिरु नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी केले आहे.

Web Title: Leopard again in Beed district; A goat was killed in a leopard attack in Sringeri Devi area in Ashti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.