शिकारीच्या मागे पळताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

By सोमनाथ खताळ | Published: August 17, 2023 12:53 PM2023-08-17T12:53:04+5:302023-08-17T12:55:28+5:30

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील घटना 

Leopard dies after falling into well while chasing animal for hunt | शिकारीच्या मागे पळताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

शिकारीच्या मागे पळताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा-
वनपरिक्षेत्र हद्दी लगत एका खाजगी शेतकऱ्याची विहीर आहे. विहीराला कठडे नसल्याने शिकारीच्या मागे पळत असताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री समोर आली.वनविभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी जाळीच्या माध्यमातून बाहेर काढले.

आष्टी तालुक्यातील देवळाली ( पानाची) येथील वनपरिक्षेत्र हद्दी लगत  बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान वनपरिक्षेत्र कर्मचारी फिरत असताना परिसरात पाच परस खोल असलेल्या  विहीरत पडला होता.दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता बिबट्या विहीरीत पडुन मृत झाल्याचे निदर्शनास आले. रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी  जाळ्याच्या माध्यमातून बाहेर काढले. पशुवैद्यकीय पथक प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक साठे, डाॅ.धनजंय राजगुडे, डाॅ.आश्विनी चोपडे, डाॅ.भाऊसाहेब कावदार यांनी शवविच्छेदन करत वनपरिक्षेत्र हद्दीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

यावेळी आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल बाबासाहेब मोहळकर , वनरक्षक अशोक काळे, बाबासाहेब शिदे, बन्सी तांदळे,शेख युनूस, दत्तु भुकन,कानिफनाथ पवार,जयसिंग मोहिते, उपस्थित होते. वनपरिक्षेत्र हद्दी लगत ज्या शेतकऱ्यांच्या विहीरि आहेत. अश्यानी उंच कठडे बांधुन घ्यावेत. वन्यप्राणी विहीरीत पडलेला आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केले आहे.
सदरील बिबट्या अंदाजे दोन वर्षाचा असुन पाण्यात पडल्याने तीन दिवसापुर्वी मृत्यू झाला असावा असे पथक प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक साठे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Leopard dies after falling into well while chasing animal for hunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.