सावरगाव शिवारात आढळला बिबट्या; शेतकर्यांत भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:27 PM2020-11-30T19:27:10+5:302020-11-30T19:27:39+5:30
याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनास दिली आहे.
माजलगाव : तालुक्यातील सावरगाव शिवारात सोमवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे.
तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे रोजच्या प्रमाणे सोमवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी 1 वा. दरम्यान त्यांना अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढत ग्रामस्थांना यांची माहिती दिली. यावर बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे , पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, सरपंच अभिमान जगताप, सुग्रीव नाईकनवरे, बाबा नाईकनवरे, पिराजी नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले. याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनास दिली आहे. यावरून तहसीलदार यांनी वनविभागाच्या अधिका-यांना कळवले आहे.