माजलगावात हमीभाव केंद्राकडून खरेदी केलेल्या मालापेक्षा शेतकर्‍यांना कमी पैस्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:31 PM2018-01-25T17:31:22+5:302018-01-25T17:31:52+5:30

शेतकर्‍यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

Less money distribution to farmers than goods purchased in Majalgaon | माजलगावात हमीभाव केंद्राकडून खरेदी केलेल्या मालापेक्षा शेतकर्‍यांना कमी पैस्यांचे वितरण

माजलगावात हमीभाव केंद्राकडून खरेदी केलेल्या मालापेक्षा शेतकर्‍यांना कमी पैस्यांचे वितरण

googlenewsNext

माजलगाव ( बीड ): शेतकर्‍यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

माजलगाव येथील बाजार समिती आवारातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मूग, सोयाबीन, उडीद मालाची विक्री केली आहे. हे शासकीय केंद्र खरेदी-विक्री संघाच्या वतीने चालविण्यात येत होते. या केंद्रावर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३१७ शेतकर्‍यांनी सोयाबीन ४ हजार ५९० क्विंटल, ३९१ शेतकर्‍यांनी उडीद २ हजार ९१८ क्विंटल तर ३०१ शेतकर्‍यांनी मूग १ हजार ८५३ क्विंटल घातला होता. ही संपूर्ण खरेदी प्रक्रि या आॅनलाईन नोंदणी पद्धतीने करण्यात आली होती.

यावेळी प्रत्येक शेतकर्‍यांना हेक्टरी ठराविक क्विंटलच माल घालण्याची अट ठेवण्यात आली होती. या पद्धतीने खरेदी करण्यात आलेल्या मालाची माहिती खरेदी-विक्री संघाने जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांकडे पाठविली. त्यांच्यामार्फत ही माहिती नाफेडला पाठविल्यानंतर नाफेडने याची शहानिशा करून खरेदी केलेल्या मालाचे पैसे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे पाठविले. त्यांनी तीच रक्कम खरेदी-विक्री संघाकडे पाठवली आहे. परंतु शेतकर्‍यांच्या खात्यावर मालाचे पैसे पाठवताना त्याने विक्री केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम न टाकता ती कमी प्रमाणात टाकण्यात आली आहे. अनेकांच्या खात्यात विक्री केलेल्या मालाच्या कमी रक्कम जमा झाल्याने शेतकर्‍यात खळबळ उडाली आहे. याला खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

कमी पैसे मिळाले 
खरेदी-केंद्रावर शासनाच्या नियमाप्रमाणे उडीद ३ क्विंटल ३६ किलो घातला होता, याचे एकूण पैसे १८ हजार १४४ रु पये येणे आवश्यक होते परंतु मला केवळ १३  हजार ४८० रुपयेच मिळाले आहेत. संबंधितांना मी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली.
- पांडुरंग शिंदे, शेतकरी 

नियमापेक्षा जास्त माल 
शासनाने नेमून दिलेल्या नियमापेक्षा जास्त माल शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर घातला होता. पडताळणीनंत तो अतिरिक्त माल परत आला असून लवकरच तो शेतकर्‍यांना परत करणार आहोत. यामुळे अनेक शेतकर्‍यांना कमी पैसे मिळाले आहेत.
- अमोल पांडे, शाखाधिकारी, खरेदी-विक्र ी संघ 

Web Title: Less money distribution to farmers than goods purchased in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.