दुष्काळ सरु दे, पाऊस पडू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:51 AM2019-06-06T00:51:29+5:302019-06-06T00:52:32+5:30

दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली.

Let the rain fall and let the rain fall | दुष्काळ सरु दे, पाऊस पडू दे

दुष्काळ सरु दे, पाऊस पडू दे

Next
ठळक मुद्देबीडमध्ये मुख्य नमाजवेळी अल्लाहकडे प्रार्थना : रमजान ईद उत्साहात

बीड : दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली. जिल्हाभरात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला.
बीड येथे नाळवंडी रोड ईदगाह तसेच शहरातील बालेपीर येथील नवी ईदगाह, दर्गाह मशीद, मर्कज मशीद, जामा मशीद, इस्लामपुरा येथील बाबुशाह मशीद, तकिया मशीद, किल्ला मैदानावरील जामा मशीद, शहेंशाहनगर येथील मशीद आदी २५ धार्मिक स्थळांमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली.
नाळवंडी रोड ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता मुफ्ती सय्यद सनाउल्लाह नदवी यांनी भाषणात रमजान ईदचे महत्व सांगितले. ते म्हणाले, सद्भावना, प्रेम, बंधुतेने राहण्याची शिकवण हा सण देतो. जे रोजा (उपवास) करतात, जे उष्णता, तहान, भूख सहन करतात त्यांनी ईद साजरी केली पाहिजे. भारत देशात विविध जातीधर्माचे लोक एकत्रित राहतात.
प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे. देश पुढे गेला तर आपण सर्व आनंदात राहू यासाठी देशाविषयी प्रेम असले पाहिजे, देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली पाहिजे, असे सांगून सुखशांती साठी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर काझी फजलुल्लाह यांनी नमाज पठन केली. यावेळी चांगल्या पावसासाठी, सुख संपन्नतेसाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी तसेच हिंदू बांधवांनी एक दुसऱ्याला आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.
बीडमध्ये २५ ठिकाणी नमाज
मंगळवारी रात्री पावसानंतरही मीना बाजारमध्ये ग्राहकांची गर्दी होती. बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तरीही सणाची लगबग सुरू होती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Let the rain fall and let the rain fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.