पीटीआरच्या कामाचे श्रेय घ्यायचे त्यांना घेऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:05+5:302021-08-20T04:39:05+5:30
गेवराई : पीटीआरच्या कामाचे श्रेय मला नको, ज्यांना घ्यायचे त्यांना घेऊ द्या. राजकारण करून त्याचे भांडवल करायची गरज नाही. ...
गेवराई : पीटीआरच्या कामाचे श्रेय मला नको, ज्यांना घ्यायचे त्यांना घेऊ द्या. राजकारण करून त्याचे भांडवल करायची गरज नाही. शहरातील नागरिकांचा फक्त आशीर्वाद पाहिजे. तो असल्यावर कुठेही काही कमी पडत नाही. चांगले करता आले ते केले. वाईट कुणाचे केले नाही. नागरिकांच्या अडचणी समजावून घेतल्या. या कामात लक्ष देऊन हा प्रश्न सोडविला असून, प्रत्येकाला घरपोच पीटीआर मिळतील. काळजी करू नका, असे आवाहन आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे केले.
संजयनगर भागातील पहिल्या टप्प्यातील २०७ अतिक्रमण धारकांना १५ ऑगस्ट रोजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते पीटीआर (भोगवटा प्रमाणात्र) चे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, तहसीलदार सचिन खाडे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, जे. डी. शहा, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक ए. बी. पाटील, ॲड. घुंबार्डे, जिजा खंडागळे, ब्रम्हदेव धुरंधरे, मधुकर वादे यांची उपस्थिती होती.
आमदार पवार म्हणाले की, संजयनगरच्या नागरिकांना पीटीआर मिळाल्याचा आनंद असून, एक टप्पा पार पडला आहे. उर्वरित प्रश्नही निकाली निघेल. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच उर्वरित साठेनगर, इस्लाम पुरा, संघमित्र नगरच्या नागरिकांनाही घरपोच पीटीआर मिळतील. त्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून घरकुलही देऊ, असे आमदार पवार म्हणाले.
190821\19_2_bed_5_19082021_14.jpg
पीटीआर वाटप