सर्व मिळून कोरोनाला हद्दपार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:29+5:302021-05-27T04:35:29+5:30

कडा : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, बीड जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी घाबरून न जाता, त्यावर ...

Let's banish Corona all together | सर्व मिळून कोरोनाला हद्दपार करू

सर्व मिळून कोरोनाला हद्दपार करू

googlenewsNext

कडा : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, बीड जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी घाबरून न जाता, त्यावर मन घट्ट करावे. आपला रिपोर्ट जरी पाॅझिटिव्ह आला असला, तरी चालेल, पण मन निगेटिव्ह होऊ देऊ नका. आपलं गाव, आपलं शहर, आपला देश कोरोनामुक्त करायचा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे गरजेचे असल्याचे आवाहन ह.भ.प. डाॅ.अमित डोके यांनी केले.

आष्टी येथील आयटीआय महाविद्यालयात असलेल्या सीसीसी केंद्रावर तेथेच रुग्णांना सेवा देणारे डाॅ.अमित डोके यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मे रोजी सांयकाळी आठ वाजता कीर्तन सेवा दिली. यावेळी ह.भ.प.डोके बोलत होते.

यावेळी आष्टी शहराचे उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर, सचिन रानडे, पिंकू बळे, विनय पटधरीया, योगेश कदम यांच्यासह आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प.डोके म्हणाले, कोरोनाचा हा लढा कोणाही एकट्या-दुकट्याचा आणि निव्वळ शासन प्रशासनाचा नाही, तर सर्वांचा लढा आहे. तेव्हा खबरदारी घ्या. सर्व सूचनांचे कोटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवा. विनाकारण घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या. शासनाला सहकार्य करा. वारंवार हात स्वच्छ करा आणि जे कोरोना पाॅझिटिव्ह आलेत, त्यांनी आपले मन निगेटिव्ह करू नका, उपचार घ्या, डोक्यात सकारात्मक विचार आणा आणि लवकर बरे होऊन घरी जा, असे आवाहनही ह.भ.प.डोके यांनी केले.

आयटीआय कोविड सेंटरला येथील डाॅक्टरच असलेले अमित डोके यांनी रुग्णांना कीर्तन सेवा दिल्याने त्यांना मानसिक समाधान मिळत आहे. रुग्णांनी कोरोनाबाबतीत कसलाही विचार न आणता, उपचारासाठी प्रतिसाद द्यावा. या व्यतिरिक्त अजूनही कीर्तन, भारूड, गोंधळाचे कार्यक्रम या सेंटरमध्ये घेऊन रुग्णांची कोरोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.नितीन मोरे यांनी सांगितले.

===Photopath===

260521\nitin kmble_img-20210526-wa0023_14.jpg

Web Title: Let's banish Corona all together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.