पुन्हा एकदा नवी सुरुवात करू, काय मिळेल याची चिंता नाही: पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 04:21 PM2022-06-03T16:21:14+5:302022-06-03T16:22:13+5:30

''कर्म आणि धर्माचे राजकारण केले पाहिजे''

Let's make a fresh start, no worries: Pankaja Munde | पुन्हा एकदा नवी सुरुवात करू, काय मिळेल याची चिंता नाही: पंकजा मुंडे

पुन्हा एकदा नवी सुरुवात करू, काय मिळेल याची चिंता नाही: पंकजा मुंडे

googlenewsNext

गोपीनाथगड (बीड) : सत्तेसाठी नाही तर वंचितांसाठी मी पुन्हा उभी राहिल. माझी चिंता करू नका, पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. आता काय मिळेल याची चिंता न करता पुन्हा नवी सुरुवात करू, असा निर्धार माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. त्या लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गड येथे आयोजित अभिवादन सभेत बोलत होत्या. 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांची प्रमुख उपस्थिती आहे. माजीमंत्री पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, तुम्ही येथे आलात आम्हाला आनंद झाला. तुम्ही ओबीसींच्या आरक्षण दिले. यामुळे आम्ही तुमचे स्वागत करतो. शिवराज सिंह तुम्ही गरिबांचे नेते आहात. माझे प्रभारी पद राहो अथवा नाही आपल्याशी आता जन्मभराचे नाते राहील, अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या.

वंचितासाठी मी कायम उभी 
ओबीसींचे सुरक्षितता राहण्यासाठी ओबीसी आरक्षण हवे आहे. शिवराजसिह यांनी दिले आपण का देऊ शकत नाही. मला पराभवाने खूप काही शिकविले. आताच्या राज्य सरकारमध्ये काय चालले आहे. जात, पात राजकारण सुरू आहे. माझे कार्यं सत्तेसाठी नाही वंचितासाठी आहे. मुंडे साहेबांच्या विचारासाठी आहे. वंचितासाठी मी कायम उभी राहील, असा निर्धारही पंकजा मुंढे यांनी व्यक्त केला. कर्म आणि धर्माचे राजकारण केले पाहिजे. सामन्यांशी नाळ जोडण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

Web Title: Let's make a fresh start, no worries: Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.