बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:32 AM2020-01-28T00:32:49+5:302020-01-28T00:33:32+5:30

बीड : बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणकि, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्र ीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास ...

Let's try to develop the boundary of Beed district | बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया

बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य ध्वजारोहण वेळी धनंजय मुंडेंचे प्रतिपादन

बीड : बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणकि, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्र ीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास देत जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करु या, असे आवाहन सामाजिक न्याय, विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आ. संदीप क्षीरसागर, प्र. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतवादन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस, होमगार्ड, एनसीसी, सैनिकी शाळा, स्काऊट गाईड, आरएसपी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयासह १७ प्लाटूनने संचलन करून त्यांना मानवंदना दिली. नेतृत्त्व आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. द्वितीय कमांडर म्हणून जी. वाय, शेख यांनी काम पाहिले. पोलीस वाहन वज्र, आरसीपी वाहन, महिला दामिनी पथक, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचा चित्ररथ यांनी संचलनात सहभाग घेतला. ध्वजारोहण कार्यक्र मानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, विद्यार्थ्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. विविध विभाग प्रमुख, आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगिता धसे व ए.बी. शेळके यांनी केले.
मतदानाचा हक्क बजवावा
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, यापुढे दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्र मात भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे नागरिकांच्या मनात भारतीय संविधानातील मूलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रु जवणूक होऊन जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल. सुजाण मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही
त्यांनी केले.

Web Title: Let's try to develop the boundary of Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.