लॉकडाऊन काळात तहसील कार्यालयात मिळणार परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:58+5:302021-03-26T04:33:58+5:30

बीड : तहसील कार्यालयाच्या पातळीवरती परवाने देण्याकरता स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाकरिता एक स्वतंत्र ई-मेल ...

License will be available at tehsil office during lockdown | लॉकडाऊन काळात तहसील कार्यालयात मिळणार परवाना

लॉकडाऊन काळात तहसील कार्यालयात मिळणार परवाना

googlenewsNext

बीड : तहसील कार्यालयाच्या पातळीवरती परवाने देण्याकरता स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाकरिता एक स्वतंत्र ई-मेल आयडी निर्माण करण्यात आला असून, त्या ठिकाणी त्या कक्षामध्ये दोन कर्मचाऱ्यांचे व्हॉट्सॲप क्रमांक जनतेला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ज्या नागरिकांना कोणत्याही अतितातडीच्या कारणास्तव परवान्याची आवश्यकता असेल, अशा नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा ई-मेल वरती विहित नमुन्यात मधील अर्ज त्याबरोबर अत्यावश्यक कागदपत्रे जोडून आपला अर्ज सादर करावा त्यांना त्याच दिवशी विहित नमुन्यामध्ये संबंधित सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी देण्यात येणार आहे.

नागरिकांची अडचणीच्या काळात गैरसोय होऊ नये याकरिता व्हॉट्सॲप आणि ई-मेल वरती परवानगी देण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ज्या तहसील कार्यालयाच्या पातळीवरती परवानगी मिळण्यास अथवा संपर्क साधण्यास नागरिकांना अडचण होत असेल अशा नागरिकांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी स्वतंत्र कक्षाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. अशा प्रकारचे अर्ज स्वीकारण्यासाठी व त्यावर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे. तहसील कार्यालयामध्ये परवानगीसाठी ज्या ई-मेल आयडी व व्हॉट्सॲप क्रमांकावरती अर्ज करावयाचा आहे त्यांची माहिती,परवान्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

तहसील कार्यालयांनी सहकार्य करावे

नागरिकांच्या अडचणीच्या काळाता ई-मेल किंवा व्हॉटस्अपच्या माध्यमातून परवानगी मागितली तर, तत्काळ गांभिर्य समजून परवानगी देण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तहसिलदरांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: License will be available at tehsil office during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.