मुलास जाळून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप; पत्नीलाही दिले होते जिवंत पेटवून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:54 PM2018-11-28T18:54:28+5:302018-11-28T18:57:44+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीला पेटवून दिले. तीने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले.

life imprisonment to the father who burns the child; The wife was also given a living fire | मुलास जाळून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप; पत्नीलाही दिले होते जिवंत पेटवून 

मुलास जाळून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप; पत्नीलाही दिले होते जिवंत पेटवून 

Next
ठळक मुद्देपत्नीलाही पेटवून देत जिवे मारण्याचा केला प्रयत्नमाजलगाव न्यायालयाचा निकाल 

माजलगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीला पेटवून दिले. तीने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल माजलगाव येथील अपर सत्र न्या. ए.एस.वाघमारे यांनी आज दिला.

सुरेश जयद्रथ मस्के (सोनवळा ता.अंबाजोगाई) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. सुरेश हा आपली पत्नी विद्याच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने २६ मे २०१६ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेशच्या तावडीतून सुटका करीत विद्या घराबाहेर धावली. त्यानंतर सुरेशने आपला पोटचा सात वर्षाचा मुलगा यश यालाही पेटविले. यामध्ये तो ८५ टक्के भाजला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर विद्या यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३०२, ४९८अ, १२०ब सह कलम ३४ भादवी प्रमाणे सुरेशविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी.एम.तडसे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. 

त्यानंतर  अ‍ॅड.अजय तांदळे यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी असणारी आई विद्या व वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.जी.पवार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तसेच यशचा मृत्यूपूर्व जबाबही शिक्षा लागण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. याच पुराव्यावरून अप्पर न्या. ए.एस.वाघमारे यांनी सुरेश मस्के याला दोषी ठरवित यशला जाळून मारल्याप्रकरणी कलम ३०२ नुसार जन्मठेप व पाच हजार  रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

पत्नी विद्या हिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ नुसार दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी आणि  ३ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद तसेच जाच, जुलूम केल्याप्रकरणी कलम ४९८ अ प्रमाणे दोषी ठरवून दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे वरिष्ठ सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना सहा. सरकारी वकील आर.ए.वाघमारे व अ‍ॅड.प्रमोद भोले यांनी सहकार्य केले.

Web Title: life imprisonment to the father who burns the child; The wife was also given a living fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.