शिवसेना पदाधिका-याच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 04:01 AM2017-09-16T04:01:30+5:302017-09-16T04:01:46+5:30

शिवसेना तालुका उपप्रमुख मधुकर शिंदे यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. अशोक पवार, अनिल पवार व देवीदास पवार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

 The life imprisonment for the Shiv Sena executive | शिवसेना पदाधिका-याच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप  

शिवसेना पदाधिका-याच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप  

googlenewsNext

बीड : शिवसेना तालुका उपप्रमुख मधुकर शिंदे यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. अशोक पवार, अनिल पवार व देवीदास पवार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
१० आॅगस्ट २०१४ रोजी शिंदे रात्री पोखरी येथे दुचाकीवरून जात होते. याच वेळी ढेकणमोहा ते काळेगावदरम्यान अशोक, अनिल व देवीदासने रस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने १५ वार केले. त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला. न्या. एस.आर. कदम यांच्यापुढे या प्रकरणी जबाब नोंदविण्यात आले. यामध्ये सुशील व जगन्नाथ पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार तिन्ही आरोपींना जन्मठेप व दंड ठोठावला.

शर्टच्या बटणावरून तपास
घटनास्थळी आरोपी अशोक पवार याच्या शर्टचे बटण रक्ताने माखलेल्या फाटक्या कपड्याच्या तुकड्यासह आढळले होते. रासायनिक विश्लेषण केले असता हे बटण व शर्टचा तुकडा हा अशोक पवारच्या जप्त केलेल्या शर्टचा असल्याचे सिद्ध झाले. हा महत्त्वाचा पुरावा ठरला.

Web Title:  The life imprisonment for the Shiv Sena executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.