शेतातून परतताना वीज कोसळली; पित्याच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:58 PM2020-06-16T13:58:50+5:302020-06-16T14:06:46+5:30
बीड जिल्ह्यात पावसाचा हा तिसरा बळी आहे.
जातेगाव (जि. बीड) : शेतातून घरी परतताना वीज कोसळल्याने पित्याच्या डोळ्यादेखत शेतकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात घडली. बीड जिल्ह्यात पावसाचा हा तिसरा बळी आहे. रवी अर्जुन पवार (२६), असे मृताचे नाव आहे.
सोमवारी रवी आणि त्याचे वडील दोघे शेतात कापूस लागवड करत होते. दरम्यान, विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. अचानक कोसळलेल्या विजेचा रवीच्या डाव्या मांडीला स्पर्श होताच तो गंभीररीत्या भाजल्याने मरण पावला. परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने उत्तरीय तपासणी मंगळवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रवी पुढे आणि मागे त्याचे वडील अर्जून हे चालत होते. दोघात अंतरही होते. वीज पडताच रवी जागीच कोसळला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू पाहण्याची वेळ वडिलांवर आली. घटनेनंतर अर्जुन पवार व कुटुंबियांना ग्रामस्थांनी धीर दिला.
बीड जिल्ह्यातील काही भागांत हजेरी
सोमवारी दुपारी साडेचार वाजेनंतर जिल्ह्यात गेवराईसह तालुक्यातील जातेगाव, गढी, पाडळसिंगी भागात चांगला पाऊस झाला. माजलगावात काही वेळ जोरदार पावसाने शेतकरी सुखावले. आष्टी शहरासह परिसरात एक तास पाऊस झाला. परळी शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबाजोगाईसह लोखंडी सावरगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत
जिल्ह्यात सहा तालुक्यात किरकोळ पाऊस झाला.
सोमवारी दुपारी साडेचार वाजेनंतर जिल्ह्यात गेवराईसह तालुक्यातील जातेगाव, गढी, पाडळसिंगी भागात चांगला पाऊस झाला. माजलगावात काही वेळ जोरदार पावसाने शेतकरी सुखावले. आष्टी शहरासह परिसरात एक तास पाऊस झाला. परळी शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबाजोगाईसह लोखंडी सावरगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात सहा तालुक्यात किरकोळ पाऊस झाला.