‘स्वाराती’मधील लिक्विड ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:18+5:302021-04-06T04:32:18+5:30
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या रुग्णांना गंभीर ...
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या रुग्णांना गंभीर स्थितीत ऑक्सिजन देणे बंधनकारक असते. रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवेसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी सिलिंडरच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून ऑक्सिजन आणावा लागत होता. यासाठी प्रशासनाची मोठी धावपळ होत असे. सहा महिन्यांपूूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून या प्लँटला मंजुरी देण्यात आली. तो आता कार्यान्वित झाला आहे. हा प्लँट सुरू झाल्यानंतर आ. संजय दौंड, अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, डॉ. धपाटे आदींनी प्लँटची पाहणी केली.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रुग्णसेवा देत असतांना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. अशा स्थितीत हा ऑक्सिजन प्लँट सुरू झाल्यामुळे आगामी काळात रुग्णसेवा सुकर होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
===Photopath===
050421\avinash mudegaonkar_img-20210404-wa0060_14.jpg