गोव्याची पावणेदोन लाखांची दारू भाटुंबा शिवारात जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:34 AM2018-12-05T00:34:35+5:302018-12-05T00:36:57+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केज तालुक्यातील भाटुंबा शिवारात टाकलेल्या धाडीत गोवा राज्यात विक्रीला असणाऱ्या विविध बॅँ्रडच्या विदेशी दारुच्या २५ पेट्या जप्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केज तालुक्यातील भाटुंबा शिवारात टाकलेल्या धाडीत गोवा राज्यात विक्रीला असणाऱ्या विविध बॅँ्रडच्या विदेशी दारुच्या २५ पेट्या जप्त केल्या. जप्त केलेल्या दारुची किंमत अंदाजे १ लाख ६८ हजार २४० रुपये असून ही कारवाई ३ डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक एम. ए. शेख, दुय्यम निरीक्षक घुमरे, गायकवाड, जवान सांगुळे, अमीन सय्यद, सादेक शेख, जारवाल, सुंदर्डे, शेळके यांनी केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील भाटुंबा शिवारात धाड टाकली असता पत्र्याचे शेड असलेल्या खोलीत विदेशी दारुचा साठा आढळून आला. या कारवाईत मॅकडॉल न. १ व्हिस्कीच्या १८० मि. ली. क्षमतेच्या ३६६ बाटल्या, मॅ. सेलीब्रेशन रमच्या १८० मिलीच्या १९२ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या, इंपेरियल ब्ल्यू व्हिसकीच्या १८० मिलीच्या १४४ बाटल्या, बॅगपाईपर व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या, ब्लेंडर्स प्राईडच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या, किंग्स ब्लेंड रमच्या ७५० मिलीच्या ३६ बाटल्या, आॅफिसर्स चॉईस व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या असा १.६८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
महाराष्टÑ राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला गोवा राज्याच्या बनावटीचा हा विदेशी मद्यसाठा होता, असे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. याप्रकरणी हनुमंत विष्णू भाले(वय ५० रा. भाटुंबा) यास अटक करुन महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.