जैन दिवाकर संस्थेच्या पात्र मतदारांची यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:44 AM2021-02-27T04:44:37+5:302021-02-27T04:44:37+5:30
बीड : येथील जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांच्या २० जागांसठी १४ मार्च रोजी निवडणूक होत असून, १३२ पात्र ...
बीड : येथील जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांच्या २० जागांसठी १४ मार्च रोजी निवडणूक होत असून, १३२ पात्र मतदारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सदानंद राऊत यांनी गुरुवारी जाहीर केली. मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याआधी ४ आक्षेप दाखल झाले होते. यातील ३ आक्षेप मंजूर करण्यात आले; तर एक आक्षेप फेटाळण्यात आला. यादीमधील संस्थापक-सदस्य किसनलाल मुनोत हे सभासद नाहीत व त्यांना मतदानाचा अधिकार नाही, असा आक्षेप सभासद मोतीलाल संचेती यांनी दाखल केला होता. यावर सुनावणी झाली. संस्थेच्या घटनेत संस्थापक-सभासद म्हणून मुनोत यांचा उल्लेख आहे. संस्थेतर्फे देण्यात आलेल्या वैध सभासदांच्या यादीत त्यांचे नाव आहे, असा युक्तिवाद ॲड. विलास जोशी यांनी केला. तसेच मुनोत यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे अथवा नसल्याचा पुरावा आक्षेप घेणाऱ्या पक्षाकडून सादर करता आला नाही. त्यामुळे मुनोत यांच्या सभासदत्वाबाबत दाखल आक्षेप फेटाळण्यात आला. --
१३२ मतदार, २७ रोजी अर्ज वाटप
धर्मादाय आयुक्त, बीड व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ३१ मार्चपूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश होते. त्यानुसार निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. सदानंद राऊत व निवडणूक प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी धर्मादाय आयुक्त द. व. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ फेबुवारी रोजी उमेदवारी अर्ज वाटप करण्यात येणार आहे. त्याची छाननी होऊन उमेदवारांची अंतिम यादी ३ मार्च रोजी प्रसिद्ध होईल.
-------