सुतार, गौस, तडकलकर यांना साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:48+5:302021-09-18T04:36:48+5:30

आंबाजोगाई : नवव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात दिवंगत संमेलनाध्यक्षांच्या नावे दिल्या जाणाऱ्या तीन साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली ...

Literary Award to Carpenter, Gauss, Tadkalkar | सुतार, गौस, तडकलकर यांना साहित्य पुरस्कार

सुतार, गौस, तडकलकर यांना साहित्य पुरस्कार

Next

आंबाजोगाई : नवव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात दिवंगत संमेलनाध्यक्षांच्या नावे दिल्या जाणाऱ्या तीन साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कथालेखक बालाजी सुतार, प्राचार्य डॉ.अखिला गौस आणि लेखिका अलका तडकलकर यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

१६ व १७ ऑक्टोबर २०२१ रोजी ९ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन प्राचार्य कमलाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनाचे सचिव अमृत महाजन यांनी या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा केली.

डॉ. अखिल गौस या महिला महाविद्यालयात प्राचार्या असून उर्दू साहित्यात त्यांचे भरीव योगदान आहे. म्हणून त्यांना प्राचार्य डॉ संतोष मुळावकर यांच्या नावाचा शिक्षक साहित्यिक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. बालाजी सुतार हे ख्यातनाम साहित्यिक आहेत. त्यांच्या कथांवर बेतलेल्या ‘गावकथा’ कार्यक्रमाने अंबाजोगाईची मान उंच केली आहे. म्हणून त्यांना मंदाताई देशमुख यांच्या नावाचा कथालेखक पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ.अलका ताडकलकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांना डॉ.शैला लोहिया यांच्या नावांनी दिला जाणारा लेखिका पुरस्कार देण्यात येत आहे, असे महाजन यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष प्रा.कमलाकर कांबळे, प्रमुख पाहुणे भगवानराव बाप्पा शिंदे, स्वागताध्यक्ष कमलताई बरुळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण संमेलनाच्या समारोप सत्रात केले जाणार आहे.

170921\1527-img-20210917-wa0022.jpg

अंबाजोगाई साहित्य संमेलन

Web Title: Literary Award to Carpenter, Gauss, Tadkalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.