कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर साहित्य गायब; तपास लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:27+5:302021-06-09T04:41:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व मयतांच्या अंगावरील आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व मयतांच्या अंगावरील आणि जवळील मौल्यवान वस्तू चोरी गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र, एकही तक्रार आतापर्यंत अधिकृतपणे प्राप्त झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. यावेळी कोरोनाची मोठ्या प्रमाणात भीती होती. वृद्ध व इतर गंभीर रुग्णांच्या जवळ नातेवाईकही थांबत नव्हते. अशावेळी काही लोकांकडून रुग्णांजवळील मौल्यवान साहित्य चोरी करण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत वडवणी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या कानातील बाळी चोरी गेल्याची तक्रार बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याला वर्ष उलटले तरी अद्यापही याचा तपास लागलेला नाही.
कानातील बाळी चाेरी
वडवणी तालुक्यातील एका वृद्धाला कोरोनाच्या पहिल्या लाटेत वॉर्ड क्रमांक सहामध्ये दाखल केले होते. यावेळी त्यांच्या कानातील बाळी व इतर मौल्यवान साहित्य चोरी गेल्याची तक्रार मुलाने बीड शहर पोलिसांत दाखल केली होती.
पाॅकेट चोरी
जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णाच्या खिशातील पॉकेट अज्ञाताने चोरल्याची तक्रार नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. त्याचा तपासही अद्याप लागला नसल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
इंजेक्शनही पळविले
कोरोनाग्रस्ताजवळील मौल्यवान वस्तू तर चोरी गेल्याच आहेत. परंतु, एकाने चक्क रेमडेसिवीर इंजेक्शनही पळविले होते. याबाबत बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. आरोपीला अटक करून इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले होते.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तक्रारी प्राप्त झाल्या.
०२