सोशल मीडियावर नादच केलाय थेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:31+5:302021-08-26T04:35:31+5:30

बीड: वाढदिवसाचे सेलिब्रेशन हटके अंदाजात करण्याची फॅशन अलीकडे रूढ होत आहे. केक कापण्यासाठी थेट चाकू, तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा सर्रास ...

Live on social media ... | सोशल मीडियावर नादच केलाय थेट...

सोशल मीडियावर नादच केलाय थेट...

Next

बीड: वाढदिवसाचे सेलिब्रेशन हटके अंदाजात करण्याची फॅशन अलीकडे रूढ होत आहे. केक कापण्यासाठी थेट चाकू, तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा सर्रास वापर केला जातो. काही जण पिस्तुलासह फोटो शेअर करून सोशल मीडियावर हवा करतात. या उपद्व्यापामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊन वाढदिवसाच्या दिवशीच पोलिसांचा पाहुणचार घेण्याची वेळ येऊ शकते. सोशल मीडियावरील वाढत्या गुंडागर्दीवर २४ तास वॉच असल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस निरीक्षक आर. एस. गायकवाड यांनी दिली.

...

तलवारीने केक कापण्याची फॅशन

बीडमध्ये गल्लीबोळातील कार्यकर्त्यांचे लॉंचिंग वाढदिवसाला मोठमोठे पोस्टर्स, बॅनर्स लावून केले जाते. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी, भरस्त्यात दुचाकी किंवा कार आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला जातो. सोशल मीडियावर याचे फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. यातून त्या - त्या भागात वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा तरुणांमध्ये लागते. यातून वादविवादही होतात.

...

कट्टा, तलवार अन् चाकू

आमचं काळीज... दादा, भाऊ, भैया, जिगर अशा उपमा देऊन बर्थडे बॉयवर स्तुतिसुमने उधळणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जातात. वाढदिवस जंगी साजरा करण्याची तरुणांच्या गटांमध्ये स्पर्धा असते. यासाठी थेट कट्टा, तलवार अन् चाकूचा सर्रास वापर केला जातो. ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट... सारखे बॅकसाँग जोडून व्हिडिओ तयार केले जातात. रात्रभर बर्थडे पार्टीचा धुमाकूळ सुरू असतो. यात यथेच्छ दारू व चमचमत्या पदार्थांची रेलचेल असते.

...

लाईक करणारेही येणार अडचणीत

सोशल मीडियावर तलवारीने केेक कापतानाचे व्हिडिओ, फोटो शेअर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. सोबतच लाईक, शेअर करणारे चाहतेदेखील अडचणीत येण्याची शक्यता असते. अशा लोकांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. सोबतच गुन्ह्यात सहआरोपीदेखील केले जाऊ शकते. लाईक, कमेंटमधून अशा लोकांना प्रोत्साहन देणे गुन्हा आहे.

...

दाखल गुन्हे

२०१९ १२

२०२० ८

२०२१ ०३

...

Web Title: Live on social media ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.