भार वाढला, उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:38 AM2019-07-11T00:38:13+5:302019-07-11T00:39:04+5:30

मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Loads increased, yield decreased | भार वाढला, उत्पन्न घटले

भार वाढला, उत्पन्न घटले

googlenewsNext
ठळक मुद्देसततच्या दुष्काळामुळे अस्थिरता वाढली : कष्टकऱ्यांच्या जिल्ह्यात स्थायी रोजगाराचा अभाव

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दर दोन वर्षांनी दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्याला करावा लागत आहे. केवळ शेतीवर आधारित येथील व्यापार उदीम असल्याने त्याचा प्रत्येक घयकावर तसेच मानवी जीवनमानावर परिणाम झाला आहे. २०१०-११ च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८५ हजार ४९ इतकी होती. आठ वर्षांचा आढावा घेतला असता यात जवळपास अडीच लाखांची वाढ झाल्याचे दिसते. लोकसंख्या वाढत असताना गुणवत्तेचे दोन- चार घटक सोडले तर अनेक समस्यांचा आलेख वाढत आहे.
मागील आठ वर्षात शाश्वत रोजगार निर्मिती न झाल्याने बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच वर्षात शेती उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे दिसून येते. पुरेसे पर्जन्यमान नसल्याने अन्नधान्याचे उत्पादन घटले. त्याचबरोबर पाणी टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. शेतजमिनीचा निवासी वापर वाढल्याने शेतजमीन क्षेत्र घटले. निवासी वापराचा भार वाढत चालला आहे. महागाई तसेच चारा टंचाई, कमी पाऊस यामुळे पशूधन सांभाळणे कठीण झाल्याने पशुधनांची संख्या घटत आहे. रोजगाराचा अभाव असल्याने कामकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.
रेडीरेकनर (बीड शहर)
डिसेंबर २०१८ पर्यंत बीड शहरात एकूण मालमत्तेची संख्या ५६ हजार इतकी आहे. यात खुली जमीन, घरे, कार्यालये, संकुल, मैदान आदींचा समावेश आहे. शहरातील घरांची संख्या ४३ हजार ३८० इतकी आहे.
२०१०-११ मध्ये दस्त नोंदणी ५६ हजार ५८६ झाली. उद्दिष्ट ५० कोटी तर वसुली ५७.४८ कोटी इतकी झाली. २०१८-१९ मध्ये दस्त संख्या ४६ हजार ८०२ झाली. १०८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. १२१.०२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. खरेदी- विक्री, गहाण, बक्षीस, भोडपट्टे, वाटपपत्र आदींचा समावेश आहे.

सुभाष रोड : २०११ मध्ये खुली जमीन ९ हजार रुपये तर निवासी ९ हजार २०० रुपये प्रती चौ मीटर २०१९ मध्ये २४ हजार ७०० रुपये प्रती चौ. मीटर खुली जमीन तर निवासी ३५ हजार रुपये चौ. मीटर.
जिजामाता चौक ते सुभाष रोड : खुली जमीन २०११ मध्ये ५८०० तर निवासी ८८०० रुपये प्र. चौ. फूट. / २०१९ मध्ये खुली जमीन १६ हजार रुपये चौ. मी. तर निवासी २६ हजार रुपये प्रती चौ. मीटर
शिवाजी पुतळा ते राजुरी वेस : खुली जमीन ६७०० रुपये २०११ मध्ये होती ती आज १८५०० रुपये चौ. फूट आहे. २०११ मध्ये निवासी ८८०० तर सद्या २७ हजार रुपये आहे.
सम्राट हॉटेल ते शाहू नगर :२०११ मध्ये खुली जमीन ४४०० तर २०१९ मध्ये ११२००, २०११ मध्ये निवासी ९२०० तर सध्या २१ हजार
जालना रोड ते मोंढा : २०११ मध्ये खुली जमीन ९ हजार ५०० रपये चौ फूट तर सध्या २४ हजार रुपये आहे. निवासी जमीन २०११ मध्ये ९ हजार २०० आज ३४ हजार ५०० रुपये आहे.
बार्शी रस्ता : २०११ मध्ये खुली जमीन ५ हजार २०० तर निवासी ९ हजार २०० रुपये होती. २०१९ मध्ये खुली जमीन १३५०० तर निवासी २४ हजार रुपये आहे.

Web Title: Loads increased, yield decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड