जिल्ह्यातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:55+5:302021-09-10T04:40:55+5:30
बीड : कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या दोन गुंडांवर एमपीडीचा (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) फास आवळण्यात आला. दोघांना पकडून औरंगाबादेतील ...
बीड : कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या दोन गुंडांवर एमपीडीचा (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) फास आवळण्यात आला. दोघांना पकडून औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली.
उमेश दत्तात्रय पोखरकर (२८, रा. नागझरी परिसर, अंबाजोगाई) व बबन कल्याण पवार (३०, रा. कोरेगाव, ता. केज) अशी त्या आरोपींची नावे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींवर पोलिसांचा वॉच आहे. उमेश पोखरकरवर याच्यावर २०१३ ते २०२१ या दरम्यान अंबाजोगाई शहर व केज येथे सरकारी नोकरावर हल्ला करणे, दंगा करणे, रस्ता अडविणे, मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे चार गुन्हे नोंद आहेत. अंबाजोगाई शहर पोलिसांनी १८ जून २०२१ रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला होता. केजमध्ये बबन पवारवर २०१५ ते २०२१ दरम्यान मारहाण, दहशत पसरविणे, शिवीगाळ, दरोडा, चोरी, रस्ता अडविणे असे ६ गुन्हे नोंद आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, अंबाजोगाई शहर ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार, केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार, अभिमन्यू औताडे यांनी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
....
जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी
पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्यामार्फत हे दोन्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे गेले होते. शर्मा यांनी ८ सप्टेंबर रोजी दोघांच्या प्रस्तावांना एमपीडीएनुसार कारवाईस मान्यता दिली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले गेले. ९ सप्टेंबर रोजी त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली.
...