जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:24+5:302021-05-14T04:33:24+5:30

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुन्हा २५ ...

Lockdown in the district increased again | जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला

जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला

Next

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पुन्हा २५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला असून, १३ मे रोजी याचे आदेश काढण्यात आले आहेत. हे निर्बंध १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून २५ मेपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, पेट्रोल पंप, टपाल सेवा आदी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापनावगळता इतर कोणत्याही आस्थापना या कालावधीत सुरू राहणार नाहीत.

तर, दूध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरू राहील. गॅस वितरण मात्र, दिवसभर सुरू राहणार आहे. बँक ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणाऱ्या आस्थापनांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात एटीएम कॅशच्या वाहनांना परवानगी असेल तसेच दुपारी १ ते ४.४५ वाजेपर्यंत बँक कर्मचाऱ्यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा देण्यात आली आहे.

शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील. (कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.) लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींचा दुसऱ्या डोससाठी मेसेज आला आहे, आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास परवानगी असणार आहे.

कृषी व्यवसायाशी संबंधित बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरवणात येणार आहेत. नरेगाची कामे सुरू राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा व कोविड १९ विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल. स्वस्थ धान्य धान्य दुकानदारांनी २१ मे पासून सकाळी ७ ते ११ या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. लाभार्थ्यांनी आधार, रेशनकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

दहा दिवस मद्यविक्री पूर्णवेळ बंद

जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्यविक्री पूर्णवेळ बंद राहणार आहेत. १५ मे रोजी रात्री १२ वाजेपासून २५ मेपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Lockdown in the district increased again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.