लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सूट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:22+5:302021-04-01T04:33:22+5:30

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जनता शासन-प्रशासन लावत असलेल्या लॉकडाऊनला सातत्याने सामोरे जात आहे. यामुळे छोटे-छोटे उद्योग व्यवसाय करणारे, मोलमजुरी ...

Lockdown from seven in the morning to seven in the evening | लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सूट द्या

लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सूट द्या

googlenewsNext

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जनता शासन-प्रशासन लावत असलेल्या लॉकडाऊनला सातत्याने सामोरे जात आहे. यामुळे छोटे-छोटे उद्योग व्यवसाय करणारे, मोलमजुरी करणारे, भाजीपाला-फळफळावळ विक्री करणारे, रिक्षाचालक, हातगाडी चालक, या सर्वांचे कंबरडे मोडले आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, मोठमोठे उद्योजक आणि नोकरपेशा लोक सोडले तर सर्वजण आर्थिकदृष्ट्या पार खचून गेले आहे. अशा अवस्थेमध्ये यापुढे बारा तासांपेक्षा जास्त लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. शासन बरहुकुम प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेळोवेळी लॉकडाऊनचा आदेश देऊन सर्वसामान्य गोरगरिबांची आर्थिक कोंडी करत आहे.

या बाबीकडे शासनकर्त्यांसह प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक आहे. याकडे शासन-प्रशासन हवे तसे लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे जनतेमध्ये हळूहळू शासन-प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. जर खिशात पैसा नसेल तर लोक कसे जगतील? आवश्यक नियम व निर्बंधाचे सक्तीने पालन करणे आणि जनतेकडून करून घेणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. प्रत्येकाला मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वगैरे बाबींची पूर्तता करून या महामारीला आटोक्यात आणता येऊ शकते तर मग लोकांचे उद्योगधंदे, कामे बंद करून लॉकडाऊन करून काय हशील आहे? याचा विचार व्हावा, अशी मागणी शेख मतीन यांनी

केली आहे.

Web Title: Lockdown from seven in the morning to seven in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.